गोवा : ३ दिवसांच्या पर्यावरण चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
जी-२० बैठकीच्या अनुषंगाने सहभागी जी-२० देशांचे ५० चित्रपट आणि गोव्यातील २ चित्रपट प्रदर्शित केले जाणार
पणजी, ३ जून (सप) – पर्यावरणीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन ३ जून या दिवशी गोवा मनोरंजन संस्थेच्या मॅकेनिझ पॅलेस चित्रपटगृहात आयोजित करण्यात आले. पर्यावरणाशी संबंधित जागतिक समस्यांवर प्रकाश टाकणार्या या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन पर्यावरण आणि हवामान पालट मंत्री नीलेश काब्राल आणि जी-२० (गोवा)चे सचिव (शिष्टाचार) अन् नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्स आणि गोवा राज्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांच्या हस्ते झाले.
Goa’s first environmental film festival gets underwayhttps://t.co/cVirMkpGFn#environment #environmental #films #filmfestival
— Gomantak Times (@Gomantak_Times) June 3, 2023
उद्घाटनानंतर कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या उद्घाटनपर चित्रपटाचे प्रदर्शन झाले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. सोमवार, ५ जूनपर्यंत चालणार्या महोत्सवात प्रदर्शित होण्यासाठी निवडलेल्या चित्रपटांच्या सर्व दिग्दर्शकांचे उद्घाटन समारंभात अभिनंदन करण्यात आले.
(सौजन्य : Prudent Media Goa)
पर्यावरणीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री नीलेश काब्राल म्हणाले, ‘‘आम्ही आज येथे जी-२० देश आणि राज्यातील पर्यावरणाला समर्पित ५० चित्रपटांचे उद्घाटन अन् उत्सव साजरा करण्यासाठी आलो आहोत.’’ गोव्यातील जी-२० बैठकींवर देखरेख करणारे नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्स यांच्या समर्पित प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.
संजित रॉड्रिग्स म्हणाले, ‘‘माझ्या मते पर्यावरण हा अतिशय प्रिय विषय आहे आणि मनाला स्पर्श करणारा विषय आहे. गोव्यात जी-२० च्या ९ बैठकांसाठी आम्ही अशा उत्साहाने काम करत असल्याने येथील स्थानिक लोकांशी त्याचा संबंध असावा असे आम्हाला वाटले. चित्रपट हे जागरूकता आणण्याचे एक उत्तम माध्यम आहे आणि सर्वांना मान्य असलेले माध्यम आहे. आम्ही या चित्रपट महोत्सवात स्थानिक गोव्याचा दृष्टीकोन आणला आहे. या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे.
The 3-day Goa Environmental Film Festival (GEFF) begins today#goa #india #goatourism #indiatourism #GEFF #films https://t.co/KJ1lR9S3rW
— Gomantak Times (@Gomantak_Times) June 3, 2023
पर्यावरण चित्रपट महोत्सवाच्या लोगोचे सर्वत्र कौतुक झाले आहे. गोवा मनोरंजन संस्थेच्या परिसरात दिसणारे लोगो प्लास्टिक कचर्याच्या वापरावर लक्ष केंद्रित करण्याच्या कल्पनेने विकसित केले गेले आहेत आणि यामुळे लोकांना प्लास्टिक कचर्याचा चांगल्या प्रकारे वापर आपल्या दैनंदिन जीवनात कसा करू शकतो, याची प्रेरणा मिळते.’’ जागतिक पर्यावरणदिनी म्हणजे ५ जूनला या चित्रपट महोत्सवाची सांगता होणार आहे.