सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याची साधिकेला सूक्ष्मातून जाणवलेली अलौकिक वैशिष्ट्ये !
‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. तो सर्वाेच्च असा दैवी उत्सव असल्यामुळे महर्षींनी त्याला ‘ब्रह्मोत्सव’, असे संबोधले आहे.
१. ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याच्या वेळी सोहळ्याचे स्थान वैकुंठात पोचणे
१ अ. ‘ब्रह्मोत्सव’ सोहळा चालू असलेले स्थान भुलोकापेक्षा हलके होऊन वैकुंठात पोचणे : ‘ब्रह्मोत्सव’ सोहळा चालू असतांना तेथील, तसेच सभोवतालचे वातावरण भूलोकापेक्षा हलके झाले होते. त्यामुळे सोहळा चालू असलेले स्थान थोडे वर उचलले गेले. सोहळ्यातील चैतन्य अधिक प्रमाणात आणि निर्गुण स्तरावर असल्यामुळे ते स्थान आणखी वर, म्हणजे पंचतत्त्वांच्याही पलीकडे गेले. नंतर ते स्थळ पंचतत्त्वाच्याही पुढे सूक्ष्मतम स्तरावर गेल्याने ते पुष्कळ दैवी होते आणि तेथे देवतांचे अस्तित्व होते. त्यानंतर ते स्थळ आणखी पुढे जाऊन वैकुंठात पोचले.
१ आ. ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने श्रीविष्णूने साधकांना वैकुंठाचे दर्शन देणे : ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने श्रीविष्णूला त्याच्या भक्तांना वैकुंठाचे दर्शन देण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने त्याच्या लीलेद्वारे ब्रह्मोत्सवासाठी सर्व साधकांना बोलावले. श्रीविष्णूने त्याच्या भक्तांना वैकुंठलोकापर्यंत नेले. त्या वेळी वैकुंठ पृथ्वीच्या थोडे नजीक आले होते.
१ इ. साधकांतील शुद्ध-सात्त्विक भाव, तसेच संत आणि सद्गुरु यांचे अस्तित्व यांमुळे साधकांना भूलोक पार करता येणे शक्य झाले.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आरूढ असलेला रथ
२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आरूढ असलेल्या रथातून चैतन्याचे किरण प्रक्षेपित होऊन ते सर्व उच्च लोकांत प्रक्षेपित होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समवेत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ याही रथामध्ये आरूढ होत्या. त्या रथातून चैतन्याचे किरण प्रक्षेपित होत होते. ते किरण सर्व उच्च लोकांपर्यंत जात होते. रथामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आसनांच्या वरती ३ कळस होते. प्रत्येक कळसातून निरनिराळी शक्ती प्रक्षेपित होत होती.
२ आ. कळसांतून प्रक्षेपित होणारा रंग तीनही गुरूंमध्ये दैवी कार्यासाठी आवश्यक असलेल्या त्या त्या शक्तींशी संबंधित होता.
२ इ. कळसांतून प्रक्षेपित होणारे विविध रंग, शक्ती आणि कार्य
टीप १ : सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्या साधकांची गतजन्मीची साधना असल्याने त्यांच्यात काही प्रमाणात विष्णुतत्त्व असून ते सुप्तावस्थेत आहे.
३. श्रीविष्णु आणि त्याची शक्ती
३ अ. तीनही कळसांतून निरनिराळ्या रंगांची शक्ती आकाशाच्या दिशेने प्रक्षेपित होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समवेत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ रथामध्ये आरूढ झाल्या होत्या. रथातील त्यांच्या प्रत्येक आसनाच्या वर कळस होते. त्या कळसांतून निरनिराळ्या रंगांची शक्ती आकाशाच्या दिशेने प्रक्षेपित होत होती. त्या वेळी त्या शक्तीतून श्रीविष्णु, श्रीदेवी आणि भूदेवी यांची सूक्ष्म-रूपे प्रगट झाली होती.
३ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आसनाच्या वर असलेल्या कळसातून प्रक्षेपित होणार्या शक्तीतून श्रीविष्णूचे रूप प्रगट होणे
१. रथारूढ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आसनाच्या वर असलेल्या कळसातून प्रक्षेपित होणार्या शक्तीतून श्रीविष्णूचे रूप प्रगट झाले होते. चतुर्भूज श्रीविष्णूचा एक हात आशीर्वादाच्या मुद्रेत असून त्याच्या दुसर्या हातात गदा होती. श्रीविष्णूच्या तिसर्या हातात कमळ आणि चौथ्या हातात शंख होता.
२. ब्रह्मोत्सव असल्याने श्रीविष्णूच्या हातात सुदर्शनचक्र नव्हते, तर तो हात आशीर्वादाच्या मुद्रेत होता. ‘ब्रह्मोत्सव’ हा दिवस श्रीविष्णूने त्याच्या भक्तांना आशीर्वाद देण्याचा दिवस होय !
३ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आसनाच्या वर असलेल्या कळसातून प्रक्षेपित होणार्या शक्तीतून भूदेवीचे रूप प्रगट होणे
१. रथातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आसनाच्या वर असलेल्या कळसातून प्रक्षेपित होणार्या शक्तीतून भूदेवीचे रूप प्रगट झाले. भूदेवीने लाल काठ असलेली हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. भूदेवीचा उजवा हात आशीर्वादाच्या मुद्रेत होता, तर तिच्या डाव्या हातात कमळ होते.
२. भूदेवीच्या हातातील कमळ हे सर्व दैवी गुण आणि श्रीविष्णूप्रती असलेला शरणागतभाव यांचे प्रतीक आहे.
३ इ ३. ज्याप्रमाणे कमळ चिखलातून उगवते, त्याचप्रमाणे साधक मायेतील कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन दिव्यात्मे बनू शकतात.
३ ई. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आसनाच्या वर असलेल्या कळसातून प्रक्षेपित होणार्या शक्तीतून श्रीदेवीचे रूप प्रगट होणे
१. रथातील श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आसनाच्या वर असलेल्या कळसातून प्रक्षेपित होणार्या शक्तीतून श्रीदेवीचे रूप प्रगट झाले. तिने गुलाबी काठ असलेली हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. श्रीदेवीचा उजवा हात आशीर्वादाच्या मुद्रेत होता, तर तिच्या डाव्या हातात वेद होते.
२. श्रीदेवीच्या हातातील वेद हे ती साधकांना प्रदान करत असलेल्या दिव्य ज्ञानाचे प्रतीक आहे.
४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेल्या नामजपामुळे त्यांनी सुदर्शनचक्ररूपी मारक रूप धारण करणे
अ. ब्रह्मोत्सव सोहळ्यात वाईट शक्तींचे अडथळे येऊ नयेत, यासाठी सोहळा चालू होण्याआधी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी जवळजवळ १० घंटे नामजपादी आध्यात्मिक उपाय केले.
आ. सद्गुरु गाडगीळ यांनी केलेल्या नामजपामुळे त्यांनी सुदर्शनचक्ररूपी मारक रूप धारण केले. सद्गुरु गाडगीळ पंचतत्त्वांशी एकरूप होत आहेत. त्यामुळे ते पंचतत्त्वांवर नियंत्रण मिळवू शकतात. खरे पहाता त्यांच्या या क्षमतेमुळेच ते कार्यक्रमस्थळाला वैकुंठाच्या दिशेने जाण्यास गती देऊ शकले.
इ. ब्रह्मोत्सव सोहळा चालू असलेल्या स्थळाच्या खाली सुदर्शनचक्र फिरत होते आणि वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण करत होते. ते सूक्ष्म वायुतत्त्वाच्या रूपाने कार्यक्रमस्थळाला गती देऊन स्थळाला उच्च लोकांच्या पलीकडील वैकुंठापर्यंत जायला साहाय्य करत होते.
ई. सद्गुरु गाडगीळ यांची पूर्वजन्मीची साधना आणि या जन्मातील कठोर साधना यांमुळे हे शक्य झाले. तसेच आपण जेव्हा एखाद्या तत्त्वाशी एकरूप होतो, तेव्हा त्या तत्त्वावर नियंत्रण मिळवण्याची क्षमता आपल्यात निर्माण होते.
५. ब्रह्मोत्सवातील रथात बसलेले तिन्ही गुरु आणि फेरीमधील साधक यांच्या पोशाखामुळे कार्यरत होणारे देवतेचे तत्त्व
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र असे म्हणतात. |