उत्तराखंडच्या मंत्र्यावर ‘या खुदा’ म्हणत मुसलमान तरुणाचा आक्रमणाचा प्रयत्न !
|
डेहराडून (उत्तराखंड) – येथील डाकरा बाजारात इम्रान नावाच्या तरुणाने ‘या खुदा’ असे म्हणत उत्तराखंडचे भाजप सरकारमधील सैनिक कल्याण आणि कृषि मंत्री गणेश जोशी यांच्यावर आक्रमण केले. त्याने येथील दुकानदारांनाही मारहाण केली. त्यामुळे स्थानिकांनी त्याला पकडून चोपले. नंतर पोलिसांनी त्याला कह्यात घेतले. तो उत्तरप्रदेशच्या बिजनौर येथील रहाणारा आहे. इम्रान याच्या कुटुंबियांनी दावा केला आहे की, त्याची मानसिक स्थिती चांगली नाही.
उत्तराखंड के मंत्री गणेश जोशी पर इमरान ने चाकू से हमला करने की कोशिश की मगर समय रहते सुरक्षाकर्मियों ने बचा लिया।
pic.twitter.com/TvrEmhKxc0— Vikas Singh (@INDVikasS) June 3, 2023
गणेश जोशी या बाजारात जनसंपर्क करत असतांना इम्रान त्यांच्याकडे आला आणि त्याने त्याच्याकडून दांडक्याद्वारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जोशी यांच्या सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले आणि त्याच्या हातातून दांडके खेचून घेतले.
संपादकीय भूमिकाजेव्हा धर्मांध मुसलमान हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करतो, तेव्हा तो मानसिक रुग्ण असल्याचा दावा पोलीस नेहमीच करतात. असाच दावा आता या तरुणाचे कुटुंबीय करत आहेत. हा एक धूळफेकीचाच प्रकार आहे, हे स्पष्ट होते ! |