रथनिर्मितीची सेवा करणार्या साधकांच्या प्रयत्नांना लाभले गुरुमाऊलीचे आध्यात्मिक पाठबळ !
दिव्य रथाच्या निर्मितीची सेवा झोकून देऊन आणि भावपूर्णरित्या करणार्या साधकांचा परिचय !
‘खरे पहाता ‘साधकांच्या हातून रथ बनणे’, हीच एक मोठी अनुभूती आहे. आम्हाला कुणालाच रथ बनवण्याच्या संदर्भातील कणभरही ज्ञान नव्हते. महर्षि आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांची कृपा अन् पू. कवटेकरगुरुजी यांचे मार्गदर्शन यांमुळेच हे शक्य झाले. त्याप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्हाला या सेवेच्या संदर्भात आध्यात्मिक दिशा दिली.
१. सौ. जान्हवी रमेश शिंदे : यांनी श्रीविष्णुतत्त्व आकृष्ट करणार्या आणि आनंदाची स्पंदने प्रक्षेपित करणार्या रथाचा आराखडा सिद्ध केला.
२. श्री. गौतम गडेकर आणि सुश्री (कु.) अंजली क्षीरसागर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) : यांनी रथनिर्मितीच्या सेवेतील साधकांचा समन्वय केला.
३. श्री. दत्तात्रेय लोहार : हे कोल्हापूर येथे ‘गुरुकृपा एंटरप्रायझेस’ हे आस्थापन चालवतात. त्यांनी या रथासाठी ‘ब्रेक’ची व्यवस्था, ‘स्टेअरिंग’, चाकांचे ‘बॉल बेअरिंग’ इत्यादी बनवून दिले. त्याचप्रमाणे त्यांनी लाकडी खांब वर्तुळाकार बनवण्यासाठीचे यंत्रही टाकाऊ साहित्यातून सिद्ध करून दिले.
४. श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आणि श्री. राजू सुतार : यांनी रथावरील घुमट, कळस, तसेच रथाला लावण्यात आलेला पितळी पत्रा, या संदर्भातील सर्व सेवा केल्या. या दोघांनी अन्य साधकांच्या साहाय्याने रथाचे रंगकाम केले. शेवटचे ४ दिवस तर ते झोपलेही नाहीत. अखंड ४ दिवस जागरण करून त्यांनी रथाचे रंगकाम पूर्ण केले. अशा प्रकारे अनेकांचे योगदान आणि साहाय्य यांमुळे श्री गुरूंसाठीचा हा दिव्य रथ सिद्ध झाला !
कृतज्ञता : ‘आमची काहीच क्षमता नसतांना सप्तर्षी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची कृपा अन् पू. कवटेकरगुरुजी यांचे अनमोल मार्गदर्शन यांमुळे हा दिव्य रथ सिद्ध झाला’, त्यासाठी रथनिर्मितीच्या सेवेतील आम्ही सर्व साधक या सर्वांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत !’ – रथनिर्मितीच्या सेवेतील सर्व साधक
(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.५.२०२३)
प्रकाश सुतार, श्री. रामदास कोकाटे, श्री. मंजुनाथ दोडमणी, श्री. विनोद सुतार आणि श्री. गंगाराम मयेकर : यांनी प्रत्यक्ष रथ बनवण्यासाठीची सुतारकामाची सेवा अत्यंत भावपूर्ण आणि झोकून देऊन केली.