पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधीचा अहवाल समितीकडून शासनाकडे सुपुर्द
पणजी, २ जून (वार्ता.) – पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधीचा अहवाल सरकार नियुक्त संबंधित समितीने सरकारला सुपुर्द केला आहे. हा अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीचे कार्य हाती घेतले आहे. यासाठी सरकारने अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांचे प्रावधानही केले आहे.
(सौजन्य : Technology)
सरकारने पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यासाठीची सूची सिद्ध करण्यासाठी ५ सदस्यीय तज्ञ समितीची नियुक्ती काही मासांपूर्वी केली होती. समितीने अशा मंदिरांचा अभ्यास करून त्यासंबंधी अहवाल आता सरकारला सुपुर्द केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ही माहिती दिली.