गोव्यात ३० टक्के शॅक देहलीवाल्यांना अनधिकृतपणे चालवण्यास दिले जातात ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
(शॅक म्हणजे पर्यटकांना विश्रांतीसाठी आणि जेवणासाठी तात्पुरते बांबू आणि इतर लाकडी साहित्यापासून बनवलेले तंबू)
पणजी, २ जून (वार्ता.) – राज्यातील किनारपट्टीवर चालवल्या जाणार्या शॅकधारकांकडून ३० टक्के शॅक देहलीवाल्यांना चालवण्यास दिले जातात आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत व्यवसाय थाटला जातो. पर्यटन क्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पर्यटन खात्याचे प्रयत्न आहेत आणि यामुळे काही शॅक्सधारकांकडून नवीन शॅक धोरणाला व्यक्तीगत स्वार्थासाठी विरोध केला जात आहे, असा आरोप पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केला आहे. शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष जॉन लोबो यांनी काही दिवसांपूर्वी पर्यटन खात्यातील काही लोक शॅकधारकांकडून खंडणी वसूल करत असल्याचा आरोप करत नवीन शॅक धोरण आणि मॉडेल शॅक यांना विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटन क्षेत्रातील अनधिकृत व्यवसायाविषयी माहिती दिली.
30% shacks sublet to Dilliwalas, will take strict action: Khaunte https://t.co/7AlrOddQbu
— TOI Goa (@TOIGoaNews) June 2, 2023
ते पुढे म्हणाले, शॅकमालक संघटनेच्या अध्यक्षांनी आरोप केलेल्या व्यक्तीच्या विरोधात मी पर्यटन खात्याच्या संचालकांना भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे तक्रार प्रविष्ट करण्यास सांगितले आहे. पर्यटन खात्यातील अधिकारी किंवा एखादी व्यक्ती शॅकधारकांकडून पैसे मागत असल्यास त्यासंबंधी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे तक्रार का प्रविष्ट केली जात नाही ? एकीकडे पर्यटन खात्यावर आरोप करायचे आणि दुसरीकडे अवैध कृती चालूच ठेवायची, हे चालणार नाही.
संपादकीय भूमिकाउघडपणे असे व्यवसाय चालू असतांना पर्यटन हंगामाच्या अखेरीस ते लक्षात येणे अपेक्षित नाही तर पुढील वर्षीच्या पर्यटन हंगामाला प्रारंभ होण्यापूर्वीच यावर योग्य ती उपाययोजना काढून अवैध शॅक्स उभे रहाण्यापासून रोखणे आवश्यक आहे ! |