ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमस्थळाची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि त्यामागील शास्त्र !
१. ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमस्थळाची आध्यात्मिक रचना होण्यामागील शास्त्र
१ अ. समष्टी क्रियमाणामुळे चांगले झालेले स्थळ आणि ईश्वरेच्छेमुळे दिव्य काळ यांच्या संगमामुळे ‘कालाजेय’ (काळाच्या ओघात अजर-अमर होणारे) झालेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव ! : ‘स्थळ आणि काळ यांच्या मर्यादेत सृष्टी कार्य करते. कुठलीही घटना घडायला स्थानमहिमा आणि काळमहिमा आवश्यक असतो. काळमहिम्यामुळे उच्च आध्यात्मिक स्थानेही नष्ट किंवा दूषित होतात. त्याचप्रमाणे काळमहिम्यामुळे साधारण किंवा अपवित्र स्थळांनाही दिव्यत्व प्राप्त होते. समष्टी क्रियमाणामुळे चांगले झालेले स्थळ आणि ईश्वरेच्छेमुळे दिव्य काळ यांचा संगम झाला, तर त्या ठिकाणी घडणारे समारोह किंवा उत्सव हे ‘कालाजेय’ होतात. असाच एक ‘कालाजेय’ उत्सव, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव, म्हणजेच ब्रह्मोत्सव !
१ अ १. समष्टी संतांचे मार्गदर्शन आणि साधकांमधील समष्टी भाव अन् तळमळ यांमुळे स्थळ सात्त्विक होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाची व्यापक सिद्धता करतांना सर्व साधकांची दृष्टी, विचार आणि तळमळ कार्यक्रमाला आध्यात्मिक स्वरूप देण्याची होती. समष्टी संतांचे मार्गदर्शन आणि साधकांमधील समष्टी भाव, तळमळ यांमुळे साधकांकडून योग्य क्रियमाण घडले. यामुळे स्थळही समष्टीच्या व्यापक क्रियमाणामुळे सात्त्विक झाले.
१ अ २. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव साजरा व्हावा’, ही ईश्वरेच्छा असल्यामुळे कार्यक्रमाचा काळ आणि स्थळ यांना दिव्यत्व प्राप्त होणे : अध्यात्मातील एक तत्त्व आहे, ‘जे काही होते, ते ईश्वरेच्छेने होते.’ या तत्त्वानुसार ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव साजरा व्हावा’, ही ईश्वरेच्छा होती. ती सप्तर्षींच्या माध्यमातून देवाने समष्टीला सांगितली. यामुळे प्रत्यक्ष काळाला दिव्यत्व आले. दिव्य काळ आणि समष्टी क्रियमाण यांचा योग्य संगम झाल्यामुळे ईश्वरी तत्त्वाने साधकांना माध्यम बनवून त्या-त्या साधकांना पूरक विचार (ज्ञान) दिला अन् आध्यात्मिकदृष्ट्या उचित अशी कार्यक्रमस्थळाची रचना करून घेतली. कार्यक्रम करण्यास काळ अत्यधिक पूरक असल्याने स्थळालाही दिव्यत्व प्राप्त झाले.
१ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमस्थळी प्रवेशासाठी असलेली चार द्वारे, म्हणजे सनातन धर्मातील ‘धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष’ या पुरुषार्थांची प्रतिके !
१ आ १. कार्यक्रमाच्या स्थानी प्रवेशासाठी असलेल्या चार द्वारांची रचना : हा कार्यक्रम फर्मागुडी, गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. मुख्य कार्यक्रमाच्या स्थानी प्रवेश करण्यासाठी ४ द्वारे ठेवली होती. प्रत्येक द्वारावर एक कमान उभी करण्यात आली होती आणि प्रत्येक कमानीवर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला एक छायाचित्र लावण्यात आले होते. ती सर्व छायाचित्रे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विविध देवतांची वेशभूषा केलेली छायाचित्रे होती. या द्वारांच्या संदर्भात माहिती देतांना ईश्वराने मला सांगितले, ‘हा ब्रह्मोत्सव म्हणजे साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या विश्वव्यापक सनातन रूपाचे दर्शन होण्याचे पर्व आहे. यामुळे कार्यक्रमस्थळाची चारही द्वारे सनातन धर्मातील ‘धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष’ या पुरुषार्थांची प्रतिके आहेत.’
१ आ २. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमस्थळाच्या द्वारांची रचना साधनेचे ४ योग आणि ४ पुरुषार्थ यांनुसार होणे : अनुक्रमे भक्ती, कर्म, ध्यान आणि ज्ञान या योगमार्गांतून प्रवास करतांना साधक एक-एक पुरुषार्थ साध्य करतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भक्ती, कर्म, ध्यान आणि ज्ञान या सर्वच योगमार्गांचा समावेश असलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती केली आहे. यामुळे गुरुकृपायोगाचे जनक असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ होणार असलेल्या कार्यक्रमस्थळाची रचनाही चार पुरुषार्थांनुसार झाली आहे. यांतून ईश्वर समष्टीला सांगत आहे, ‘कुठल्याही मार्गाने साधना करा. सर्व मार्ग तुम्हाला थेट श्री गुरूंकडे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे) नेणार आहेत.’
१ आ ३. कार्यक्रमस्थळाच्या चारही द्वारांवर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे त्या त्या पुरुषार्थांशी पूरक रूप आणि काव्य प्रकटणे ही केवळ गुरुमाया असणे : कार्यक्रमस्थळाची चार द्वारे, त्या द्वाराच्या दोन्ही बाजूला असलेली श्री गुरूंची छायाचित्रे, त्या छायाचित्रांशी निगडित असलेले काव्य आणि त्याचे विश्लेषण सारणीत दिले आहे. (सारणी खाली दिली आहे.)
१ इ. गुरुमायेमुळे साधकांना आध्यात्मिक रचना केल्याचे भान न होणे : ‘कार्यक्रमाच्या स्थानी असलेली ४ द्वारे ही ४ पुरुषार्थांची प्रतीके असावीत’, असे कुणीही संत किंवा साधक यांनी ठरवले नव्हते. या द्वारांची कलेद्वारे रचना करणारे साधक वेगळे, द्वारांसाठी काव्य करणारे साधक वेगळे, द्वार उभे करणारे साधक वेगळे, असे असतांनाही त्या-त्या पुरुषार्थाचे प्रतीक असलेल्या द्वारावर त्या-त्या पुरुषार्थाशी निगडित सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तसे रूप आणि त्याला पूरक काव्य जुळून येणे, हे जणू श्री गुरूंनी भक्तांना आनंद देण्यासाठी केलेली ‘गुरुमाया’ होय ! या गुरुमायेच्या प्रभावामुळे द्वारांची विविध टप्प्यांमध्ये रचना करतांना, उदा. ‘छायाचित्र निवडतांना किंवा काव्य रचतांना कुठल्याही साधकाला ते एक-एक पुरुषार्थावर काव्य रचत असून एकूणच चारही योगमार्गांचा समावेश असलेल्या ‘गुरुकृपायोग’ या मार्गावर काव्यरचना करत आहेत’, याचे भान झाले नव्हते. यातून गुरुतत्त्वाने शिकवले, ‘साधकांनी मन आणि बुद्धी यांचा अडथळा न आणता भावभक्तीने श्री गुरूंचे आज्ञापालन केले, तर स्थुलातील कर्मांनाही आध्यात्मिक स्वरूप आणि दिव्यत्व प्राप्त होते. हेच गुरुकृपायोगानुसार साधनेचे सार आणि ‘साधकांनी या सूत्रानुसार आचरण करणे’, हीच श्री गुरुंप्रतीची खरी कृतज्ञता !’
चारही द्वारांवर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे त्या-त्या पुरुषार्थांशी पूरक रूप, काव्य आणि त्याचे विश्लेषण
टीप – सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांची बैठक व्यवस्था मोक्ष या द्वाराच्या पलीकडे होती. त्यामुळे रामनाथी आश्रमातील साधकांनी या द्वारातून कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. यांतून जणू श्री गुरूंना साधकांना सांगायचे आहे, ‘संसाराचा त्याग करून आश्रमात आलेल्या साधकांसाठी श्री गुरूंनी मोक्षाचे द्वार उघडले आहे. केवळ साधकांनी साधनेचे प्रयत्न वाढवणे शेष आहे. त्यांना नक्कीच मोक्ष मिळणार आहे.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०२३, सकाळी ९.१५ ते ११.०५ आणि दुपारी ४.१५ ते ६.५५ )
कमानीवर लिहिलेल्या काव्यपंक्ती ।त्रिगुणात्मक यह अवतार महान । गुरुकृपा से करने दुखहरण । |
या लेखाचा पुढील भाग वाचण्या साठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/689144.html