भिवंडीत कॉलसेंटर चालवणारे आतंकवादी कह्यात
सीमकार्डचे खोके जप्त
मुंबई – देशविघातक कारवाया करणार्या ‘एस्.एफ्.जे.’ या आतंकवादी संघटनेसाठी काम करणार्या टोळीचे भिवंडीतील कॉलसेंटर कर्णावती (अहमदाबाद) येथील सायबर सेलने उध्वस्त केले. येथे काम करणार्या तिघांना कह्यात घेण्यात आले असून सीमकार्डचे ४ खोके जप्त करण्यात आले आहेत.
१. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आय.एस्.आय.साठी काम करणार्या ‘एस्.एफ्.जे.’ संघटनेचे रेकॉर्ड केलेले कॉल या सेंटरच्या माध्यमातून लोकांच्या फोनवर ‘डायव्हर्ट’ केले जात होते. भिवंडीतील बांधकाम चालू असलेल्या इमारतीत हा प्रकार चालू होता.
२. कर्णावतीच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांची भेट झाली होती. त्या वेळी संशयास्पद कॉल रेकॉर्डिंग सायबर सेलच्या हाती लागले होते. त्याआधारे पथकाने मध्य प्रदेशातून काही आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत भिवंडीपर्यंत हे जाळे पसरले असल्याचे समजले. यानंतर ही कारवाई करण्यात आली.
संपादकीय भूमिका :पोलिसांना या घटनेचा थांगपत्ता कसा लागला नाही ? हे पहायला हवे ! |