शाळा, महाविद्यालये आदी विविध ठिकाणी हिंदु संस्कृती जपण्यास हातभार लावा !
जून मास चालू झाला. मुलांचे शिकवणीवर्ग, शाळा, महाविद्यालये चालू होतील. दुकानात चप्पल, बूट, छत्री, दप्तर यांच्या खरेदीसाठी एकदम गर्दी करू नका. आतापासूनच एकेक वस्तू घेण्यास चालू करा आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे आपल्या मुलींना कपाळावर बारीक का होईना; पण टिकली वा कुंकू लावण्यास सांगा. हातात एकेक बांगडी घालण्याचा आग्रह धरा. महाविद्यालयामध्ये जाणार्या मुलींना फाटक्या-तुटक्या जीन्स घालण्याऐवजी व्यवस्थित कपडे शक्यतो पंजाबी पोषाख (ड्रेस) घालण्यास सांगा. केस मोकळे सोडण्यात कसली आली फॅशन ? अगदी वेणी नको; पण एखादी पिन किंवा रब्बर लावायला सांगू शकता ना ? बघा जमते का ? – एक धर्मप्रेमी
(साभार : सामाजिक माध्यमांवरील एक बालमित्र गट)