रायगड (छत्तीसगड) येथे दानिशने हिंदु प्रेयसीला गर्भपात करायला लावून केली हत्या !
|
रायगड (छत्तीसगड) – हिंदु युवती आणि स्त्रिया यांच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादचे प्रकरण आता छत्तीसगड राज्यातील रायगड येथेही समोर आले आहे. येथे आधीपासून विवाहित असलेल्या दानिश नावाच्या युवकाने एका मागासवर्गीय हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये (विवाह न करता एकत्र रहाणे) राहू लागले. युवतीला दिवस गेल्यावर दानिशने तिला बलपूर्वक औषध देऊन तिचा गर्भपात केला. तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. यात तिचा मृत्यू झाला.
खुद को कुंवारा बता लड़की के साथ लिव इन में रहा युवक, गर्भवती होने पर खिला दी दवा#Chhattisgarh #Raigarh @Ravimiri1 https://t.co/mKmPf9CbWO
— ABP News (@ABPNews) June 1, 2023
या प्रकरणी मृत्यूच्या आधीचा पीडितेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये ती म्हणतांना दिसत आहे, ‘‘दानिश मला मारहाण करून अपमानित करत होता. मला त्याच्यापासून वेगळे व्हायचे होत; परंतु तो मला सोडत नव्हता. मला सारखा त्रास देत होता. दानिशपासून मला याआधीही एक मुलगा झाला होता. दानिशने त्याच्या जन्माच्या दोन दिवसांनंतरच त्याला गायब केले.’’
मृतक युवतीच्या भावाने आरोप केला आहे की, दानिशने स्वत:ची ओळख लपवून माझ्या बहिणीशी संबंध प्रस्थापित केले. तो तिच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव आणत होता. तिने विरोध केल्यावर तो तिला मारहाण करत होता. दानिशच्या विरोधात गुन्हा नोंद करून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष अन्वेषण पथकाची स्थापना करण्याची मागणीही युवतीच्या भावाने या वेळी केली.
संपादकीय भूमिकाअशा घटना पाहिल्यावर आता केवळ ‘द केरल स्टोरी’ येथपर्यंत सीमित न रहाता ‘द इंडिया फाइल्स’ नावाचा चित्रपट सिद्ध करून त्यातून लव्ह जिहादला बळी पडलेल्या देशभरातील सहस्त्रावधी हिंदु युवती आणि स्त्रिया यांची दैनावस्था दाखवणे अत्यावश्यक झाले आहे ! |