जपानमध्ये मंदिरावरील आक्रमणानंतर मुसलमानांना होत आहे विरोध !
२० वर्षांत जपानमधील मुसलमानांची लोकसंख्या २० सहस्रांवरून २ लाखांवर पोचली !
टोकियो (जपान) – जपानमधील कोबे शहरातील शिंटो मंदिर परिसरात पिवळे कपडे परिधान केलेल्या मुसलमान व्यक्तीने काही दिवसांपूर्वी मंदिरामधील दानपेटीला लाथ मारली होती. दानपेटीची तोडफोड केल्यानंतर त्याने ‘अल्ला एकमेव ईश्वर आहे’, असे सांगत मंदिरात प्रार्थना करणार्या महिलांना धमकावले होते. जपानमध्ये गेल्या १-२ वर्षांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यांत धार्मिक सद्भावनेवर आघात करण्यात आला. यास जपानमधील मुसलमानांची वाढती लोकसंख्या कारणीभूत असल्याचे सांगितले जात आता जपानमध्ये मुसलमानांना विरोध होऊ लागला आहे.
20 साल में ही 10 गुना बढ़ गई मुस्लिम आबादी, मस्जिद 15 से बढ़कर हुए 113: जापान के लिए भी जंजाल बना इस्लामी कट्टरपंथ, खुद के पवित्र स्थल बने निशाना#Japan #RadicalIslamhttps://t.co/Ouq3DOB1Qu
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 2, 2023
१. गेल्या २० वर्षांत मुसलमानांची लोकसंख्या वाढली आहे. वर्ष २००० मध्ये २० सहस्र असणारे मुसलमान आता २ लाखांहून अधिक झाले आहेत. मशिदींची संख्या ७ पटींनी वाढली आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे आता धार्मिक संघर्ष होऊ लागला आहे, हेच कोबो येथील घटनेतून समोर येत आहे.
२. एका धर्मोपदेशकाने सांगितले की, जपानमध्ये नागरिकांच्या मूलभूत अधिकारांत धार्मिक स्वातंत्र्याचा समावेश आहे. ‘कुठलीही व्यक्ती अन्य धर्माच्या लोकांच्या श्रद्धेला ठेच पोचू शकत नाही’, हा मूळ विचार आहे. तसे झाल्यास दोन्ही धर्मांचे लोक एकत्र राहू शकणार नाहीत. तसे करणारा मुसलमान अन्य मुसलमानांच्या रहाण्यालाही धोका निर्माण करतो.
३. एका व्यक्तीने सांगितले की, इस्लामचे उद्दिष्ट जगावर वर्चस्व निर्माण करण्याचे आहे. असा विचार जपानमधील कोणत्याही धर्मात नाही.
संपादकीय भूमिकाजपानसारख्या शांतताप्रिय देशातही मुसलमानांची लोकसंख्या वाढली, तर काय होते ?, हे जगाला पुन्हा एकदा पहायला मिळत आहे. इस्लाममध्ये ‘शांतता’ असे म्हटले जात असले, तरी संपूर्ण जगाची स्थिती पाहिली, तर हे वास्तव नाही, असेच लक्षात येते ! |