भारतातील इस्लाम सर्वांत सुरक्षित ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
नागपूर – एके काळी स्पेनपासून मंगोलियापर्यंत संपूर्ण जगाला इस्लामी राजवटींच्या आक्रमणांची भीती होती; पण हळूहळू लोक जागृत होऊ लागले. त्यांनी युद्ध करून आक्रमण करणार्यांना पराभूत केले. यामुळे इस्लम त्याच्या मूळ ठिकाणापुरताच मर्यादित राहिला. आक्रमणकर्ते निघून गेले. आता भारतातील इस्लाम हा सर्वाधिक सुरक्षित आहे, असे मत प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते येथे रा.स्व. संघाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
प.पू. सरसंघचालक पुढे म्हणाले की,
१. बाहेरील लोकांचे (मुसलमानांचे) संबंध विसरून या देशात रहा. अजूनही जे लोक त्या बाहेरच्या लोकांच्या प्रभावाखाली आहेत, तेही बाहेरचे नसून आपलेच आहेत, असे समजून त्यांच्याशी आपण चांगले वर्तन करायला हवे. जर त्यांच्या विचार करण्यात काही न्यूनता असेल, तर त्यांचे प्रबोधन करणे आपले दायित्व आहे.
२. आपला अहंकार आणि भूतकाळाचे ओझे आपण वागवत असल्यामुळे आपल्याला एकत्र येण्याची भीती वाटते.
३. ‘आपल्या प्रार्थनेच्या पद्धती वेगळ्या असल्या, तरी आपण या देशाचे आहोत आणि आपले पूर्वजही भारतातीलच होते’, हे वास्तव आपण स्वीकारणे आवश्यक आहे.
४. भारतात लोकशाही असल्यामुळे राजकीय मतभेद असणारच आहेत. सत्तेसाठी स्पर्धा आणि परस्परांवर टीका होणारच आहे; मात्र सत्ताप्राप्तीसाठी टीका करतांना जनतेत विसंवाद निर्माण होणार नाही, याचा विवेक राजकीय पक्षांनी बाळगावा.
संघ शिक्षा वर्ग, तृतीय वर्ष (सामान्य) 2023 समापन समारोह ,नागपुर महानगर https://t.co/FUKUH8hT86
— RSS (@RSSorg) June 1, 2023
संपादकीय भूमिका‘इस्लाम खतरे में है’, अशी बांग ठोकणारे धर्मांध मुसलमान नेता, तसेच ‘भारतात मुसलमान असुरक्षित जीवन जगत आहेत’, अशी आवई उठवणारे महाभाग यांना यावरून जाब विचारला पाहिजे ! |