कन्नड सक्तीच्या विरोधात आंदोलन करणार्या हुतात्म्यांना बेळगाव येथे अभिवादन !
बेळगाव – वर्ष १९८६ मध्ये कन्नड सक्तीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनात ९ जणांना बलीदान द्यावे लागले होते. या हुतात्म्यांना १ जून या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी हुतात्म्यांच्या बलीदानाचे स्मरण ठेवून, पुन्हा नव्याने लढा उभा करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला. या प्रसंगी मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, प्रकाश मरगाळे, आर.एम्. चौगुले, रमाकांत कोंडुस्कर, माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर, शुभम शेळके यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.