सच्चिदानंद परब्रह्म सत्यनारायण गुरु तुम्ही ।
१.७.२०२१ या दिवशी ‘यू ट्यूब’वाहिनीवर ‘जगद़्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना ? अनन्यभावे शरणागत मी भवभय हारण तुम्हीच ना ?’ या ‘गुरुचरित्र सार’मधील पंक्ती ऐकत असतांना मला गुरुकृपेने ओळी सुचल्या. गुरुदेव सर्व साधकांवर सतत कृपा करत आहेत. त्यातील काही सूत्रे ‘गुरुचरित्र सार’ यानुसार मांडत आहे. ते त्यांच्या चरणी अर्पण करते.
सच्चिदानंद परब्रह्म सत्यनारायण गुरु तुम्ही ।
अनन्यभावे शरणागत मी, तारणकर्ता तुम्ही ।
गुरुकृपायोगे साधना शिकवुनी, साधका उद्धरले तुम्ही ।
सारणी लिहिण्या प्रवृत्त करूनी, साधकांस घडवले तुम्ही ॥ १ ॥
घराचाही आश्रम बनवा, तुम्हीच आग्रह धरला ना ।
भाव जोडूनी कृती करण्या तुम्हीच शिकवले साधकांना ।
ग्रंथ लिहूनी आम्हा ज्ञानमोती दिले तुम्हीच ना ।
लीला अनंत करता, तरीही अलिप्त रहाता तुम्हीच ना ॥ २ ॥
आपत्काळाची सूचना देऊनी, मनोबल दिले तुम्हीच ना ।
साधकांसमवेत रहाण्यास सांगितलेे तुम्हीच ना ।
‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे ध्येय तुम्हीच रुजवले आमच्या मनी ।
सच्चिदानंद परब्रह्म सत्यनारायण गुरु तुम्हीच ना ॥ ३ ॥
– सौ. अनघा दीक्षित, बेळगाव (६.७.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |