पुणे येथील सीमा शुल्क विभागाने अमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी पकडली !
५ कोटी रुपयांचे मेथ्याम्फेटामाईन शासनाधीन !
पुणे – येथील सीमा शुल्क विभागाच्या नार्कोटिक्स विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीअन्वये अमली पदार्थ तस्करी करणार्या टोळीला पकडण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून ५ कोटी रुपयांच्या ‘मेथ्याम्फेटामाईन’सह चौघांना कह्यात घेतले आहे. अशीच कारवाई लोणावळा येथेही केल्याचे सूत्रांनी सांगितले.
संपादकीय भूमिका :एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कसे काय सापडतात ? यातून सुरक्षाव्यवस्था कशी काम करते, हे लक्षात येते ! |