छत्रपती संभाजीनगर येथील पंतप्रधान आवास योजना घोटाळ्याप्रकरणी कृषी आयुक्तांना ‘ईडी’ची नोटीस !
छत्रपती संभाजीनगर – पंतप्रधान आवास योजना घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या घरकुल योजनेत १ सहस्र कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. तेव्हा ‘ईडी’ने संभाजीनगरमध्ये १३ ठिकाणी धाड टाकली होती. यानंतर ‘ईडी’ने महापालिका अधिकार्यांची चौकशी केली. तत्कालीन महापालिका आयुक्तांचीही चौकशी केली होती आणि नंतर आता तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलावले आहे. सुनील चव्हाण सध्या कृषी आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
काय आहे प्रकरण ?छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजनेतील ० सहस्र घरे बांधण्यासाठी ४ सहस्र कोटी रुपयांची बांधकाम निविदा काढण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेत अनेक आस्थापनांनी सहभाग नोंदवला. यातील काही आस्थापनांनी अटींचे पालन न करता फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी अधिक चौकशी केल्यावर यातील समरथ कन्स्ट्रक्शन, इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आणि जगवार ग्लोबल सर्व्हिसेस या ३ आस्थापनांनी भरलेल्या निविदा संशयित होत्या, तर या निविदा एकाच लॅपटॉपवरून म्हणजे एकाच ‘आयपी’ पत्त्यावरून भरल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेच्या घरकुल बांधणीसाठी निविदा भरतांना ‘रिंग’ केल्याचा ठपका ठेवण्यात आला. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात १६ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. |