आधुनिक वैद्यांप्रमाणे रुग्णाची कोणतीही तपासणी किंवा चौकशी न करताही आजारपणाचे अचूक निदान करणारे सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची सूक्ष्मातून जाणण्याची अद्वितीय शक्ती !
‘मी मागील एक वर्षांपासून सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना मला होणार्या त्रासांवर नामजपादी उपाय विचारत आहे. त्यांनी सांगितलेल्या नामजपामुळे मला सद़्गुरु गाडगीळकाकांच्या सूक्ष्मातील जाणण्याच्या शक्तीची पुष्कळ जाणीव झाली.
१. आरंभी प्रकृतीतील चढ-उतारांप्रमाणे आधुनिक वैद्यांनी औषधांमध्ये पालट सांगणे आणि त्या वेळी सद़्गुरु गाडगीळकाकांनीही सूक्ष्मातून जाणून नामजपादी उपाय अन् उपायांचे घंटे यांत पालट करणे
अनेक दिवस माझ्या प्रकृतीत चढ-उतार होत होते. त्या वेळी आधुनिक वैद्य मला अनेकदा औषधांमध्ये पालट सांगायचे. त्यानंतर सद़्गुरु गाडगीळकाकांकडे उपाय विचारण्यासाठी गेल्यावर तेही मला सूक्ष्मातून जाणून नामजपादी उपायांमध्ये पालट सांगत असत. त्या वेळी नामजप पालटले जायचे किंवा नामजपाचा कालावधी अल्प-अधिक होत असे. सद़्गुरु काका मला ३ ते ७ घंटे या कालावधीसाठी विविध मुद्रा आणि न्यास सांगून नामजपादी उपाय सांगायचे.
२. आधुनिक वैद्यांनी खोकल्याविषयी सांगितलेले निदानच सद़्गुरु गाडगीळकाकांनी प्राणशक्ती वहन पद्धतीने नामजप शोधतांना सांगणे
मला अनेक दिवसांपासून कोरडा खोकला होत होता. आधुनिक वैद्यांनी तपासणी करून मला छातीत त्रास असल्याचे सांगितले. हा कोरडा खोकला वाढत असल्यामुळे मी सद़्गुरु गाडगीळकाकांकडे नामजपादी उपाय विचारायला गेले. सद़्गुरु काकांनी माझ्यासाठी प्राणशक्ती वहन पद्धतीने नामजप शोधला आणि त्यांनीही मला अनाहत चक्राच्या ठिकाणी त्रास असल्याचे सांगितले. तेव्हा आधुनिक वैद्यांनी सांगितलेले निदानच सद़्गुरु काकांनी केले असल्याचे माझ्या लक्षात आले. ते ऐकल्यावर मला सद़्गुरु काकांच्या सूक्ष्मातील जाणण्याच्या शक्तीची पुष्कळ जाणीव झाली. मी मनातून त्यांना ‘कृतज्ञता, कृतज्ञता’, असे म्हणत होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अनेक संत आणि साधक यांना सूक्ष्मातून जाणण्याची अद्वितीय शक्ती प्रदान केली आहे. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सनातनचे अन्य अनेक सद़्गुरु सूक्ष्मातील ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून साधकाच्या त्रासांचे निवारण करत आहेत. सद़्गुरु काकांचे प्रेम आणि कोणत्याही वेळी तत्परतेने नामजपादी उपाय सांगणे, यांमुळेच साधकांचे त्रास उणावून साधकांमध्ये नामजपाची ओढ वाढली आहे. साधकांची साधना आणि सेवा यांमध्ये प्रगती होत आहे. याबद्दल गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती रजनी नगरकर (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.७.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |