उदयपूर (राजस्थान) येथे विद्यार्थिनीला धर्मांतर करून विवाह न केल्यास ठार मारण्याची धमकी देणार्या धर्मांध मुसलमान तरुणाला अटक
उदयपूर (राजस्थान) – येथील पॅसिफिक महाविद्यालयातील विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आसिफ याला अटक केली आहे. त्याने या विद्यार्थिनीला धर्मांतर करून त्याच्याशी विवाह करण्यासाठी धमकावले होते. विवाह न केल्यास ठार मारण्याची धमकी आसिफने दिली होती. ३१ मे पर्यंत निर्णय घेण्याचेही त्याने या विद्यार्थिनीला सांगितले होते. यापूर्वीही त्याच्या विरोधात तक्रार करण्यात आल्यावर आसिफला अटक करण्यात आली होती; मात्र जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा या विद्यार्थिनीला त्रास देणे चालू केले होते. (पोलिसांनी अटक केली, तरी व्यक्तीमधील गुन्हेगारी वृत्ती नष्ट होत नाही आणि ती परत तसेच गुन्हे करते, हे अनेकदा समोर आलेले आहे. त्यामुळे गुन्हेगारी वृत्ती नष्ट होणारी शिक्षा करणे आवश्यक आहे ! – संपादक)
सौजन्य सागवरा लाईव न्यूज
संपादकीय भूमिकाअशा धमकीनंतर प्रत्यक्षात तरुणींच्या हत्यांच्या घटना घडलेल्या असल्याने अशा आरोपींनी प्रत्यक्ष कृती केली नसली, तरी त्यांना जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा करण्याची तरतूद करणे आवश्यक आहे ! |