हिंदूंच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नसते ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नवी देहली – देशातील हिंदूंच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नाही. आपल्याकडील धर्मशाळाही चांगल्या नाहीत, असे विधान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केले.
#WATCH मुझे महसूस होता है कि हमारा देश ऐसा है जहां विशेष रूप से हिंदू समाज के जो मंदिर हैं वहां स्वच्छता नहीं होती। वहां धर्मशालाएं अच्छी नहीं होती। मैं विदेशों में गया वहां के गुरुद्वारा, मस्जिद, गिरजाघरों में देखा वहां के वातावरण देख मुझे लगता था कि हमारे श्रद्धा के स्थान अच्छे… pic.twitter.com/pEzeU8t9Ln
— ANI_HindiNews (@AHindinews) May 31, 2023
गडकरी पुढे म्हणाले की, परदेशात गेल्यावर तेथील गुरुद्वारा, मशीद आणि चर्च यांचे वातावरण पाहून मला वाटले की, आपली प्रार्थनास्थळे चांगली असावीत. मला जेव्हा याविषयी काहीतरी करण्याची संधी मिळाली, त्या वेळी मी महाराष्ट्रात १२ सहस्र कोटी रुपयांचा पालखीमार्ग बांधला.
संपादकीय भूमिकाअस्वच्छ ठिकाणी माणसालाही चांगले वाटत नाही, तेथे देवाला चांगले वाटेल का ? जेथे स्वच्छता असते, तेथे देवाचे वास्तव्य असते, हे लक्षात घेऊन हिंदूंनी मंदिरांमध्ये स्वच्छता राखणे आवश्यक ! यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे ! |