गोवा : मुसलमानांनी गोव्यातून पळवून नेलेल्या २ अल्पवयीन मुलींची हुब्बळ्ळी येथून सुटका
कर्नाटकातील नावेद अहमद पानीबंद आणि तौसिफ किल्लेदार यांना अटक
पणजी, ३१ मे – कर्नाटकातील २ मुसलमानांनी चांगले जीवन देण्याचे आमीष दाखवून १२ आणि १५ वर्षांच्या २ अल्पवयीन मुलींना पळवून नेले होते. मुलींच्या कुटुंबियांनी २९ मे या दिवशी मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. कोलवाळ पोलिसांनी हुब्बळ्ळी येथून त्यांची मुसलमानांच्या तावडीतून सुटका केली.
मोठी बातमी! गोव्यातून दोन मुलींचे अपहरण, हुबळीत ठेवले ओलिस#Goa #hubli #goanews #karnataka #colvale #mapusa #crime #police https://t.co/bRNqol6zLV
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) May 31, 2023
या प्रकरणी टिपूनगर, नेकरनगर रोड, हुब्बळ्ळी येथील नावेद अहमद पानीबंद आणि धारवाड, कर्नाटक येथील तौसिफ किल्लेदार उपाख्य मुन्ना यांना हुब्बळ्ळी येथून पोलिसांनी अटक केली. आरोपींनी या मुलींना घरातून सोन्याचे दागिने आणण्यास प्रवृत्त केले. त्यांच्यासमवेत असलेले सोने दोघे आरोपी घेऊन गेले आणि मुलींना हुब्बळ्ळी येथे एका खोलीत बंद करण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी गुन्हा केल्याची स्वीकृती दिली आहे. आरोपींनी हुब्बळ्ळी येथील सोनारांना विकलेले सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर ४८ घंट्यांत गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. या दोन्ही मुली हिंदु धर्मीय होत्या का ? याची माहिती मिळू शकलेली नाही.