श्रीमती सविता नेने यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. देवद आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपाला बसल्यावर देवीच्या पायातील पैंजणांचा मंजुळ नाद ऐकू येणे
‘मी पहाटे ध्यानमंदिरात बसून नामजप करते. तिथे नामजपाला बसल्यावर मला पैंजणांचा ‘छुम, छुम’ असा मंजुळ नाद ऐकू येतो. आरंभी मी ‘मार्गिकेमध्ये कुणी साधिका आहे का ?’, हे ध्यानमंदिराच्या बाहेर सर्वत्र फिरून पहात असे; पण तेव्हा मला कुणीच दिसत नसे. मागील दीड वर्षांपासून मला हा नाद ध्यानमंदिरात नित्य ऐकू येतो. त्यानंतर वर्ष २०२१ च्या नवरात्रीत प्रतिदिन चालू असलेल्या भक्तीसत्संगात मी हा मंजुळ नाद पुन्हा अनुभवला. तेव्हा ‘तो देवीच्या पायांतील पैंजणांचा दैवी नाद आहे’, असे माझ्या लक्षात आले.
२. १३.१०.२०२१ या दिवशी ध्यानमंदिरात मोगर्याचा सुगंध दरवळत होता, तेव्हा मला अतिशय हलकेपणा जाणवत होता.’
३. ‘डिसेंबर २०२१ मध्ये मी काही दिवस कोल्हापूर येथे मुलीच्या घरी गेले होते. २८.१२.२०२१ ला सकाळी तेथे मी विष्णुसहस्रनाम ऐकत पोळ्या करत होते. त्या वेळी ‘माझी साधना कशी होईल ?’ असे विचार माझ्या मनात चालू होते. तेव्हा तव्यावरील पोळीवर शंख आणि कमळ यांचा आकार आलेला आणि पिठाचे बारीक ॐ उमटलेले दिसले. (तव्यावरून पोळी खाली घेईपर्यंत कमळाचा आकार अधिक गडद झाला.)
‘मी जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरी माझ्या समवेत माझे प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेत. ते मला कधीच एकटे सोडत नाहीत’, या विचाराने मन कृतज्ञतेने भरून आले.
या अनुभूतींसाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्रीमती सविता सुरेश नेने (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.४.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |