वणी (यवतमाळ) येथे प्रेयसीची हत्या करणार्याला अटक !
फेसबूकच्या माध्यमातून प्रेमसंबंध निर्माण
वणी (यवतमाळ), ३१ मे (वार्ता.) – येथील प्रिया बागेसर (वय २५ वर्षे) या युवतीची हत्या करण्यात आली. हत्येच्या २ दिवसांनंतर दुर्गंध येत असल्याने इमारतीच्या मालकाने याविषयी पोलिसांना दिली. पोलिसांनी केवळ ‘विनोद’ नावाच्या ‘व्हॉट्सअॅप’च्या संभाषणाद्वारे तिचा प्रियकर विनोद शितोळे (वय २५ वर्षे) याला अटक केली. आरोपीने हत्या केल्याचे असून पुढील पडताळणी चालू आहे. फेसबूकच्या माध्यमातून आरोपी आणि मृत युवती यांचे प्रेमप्रकरण चालू होते.
संपादकीय भूमिका :सामाजिक माध्यमांच्या आहारी जाऊन आणि अपरिचितांशी जवळीक साधून आयुष्याची हानी ओढावून घेऊ नका ! |