मिरज येथील काशीविश्वेश्वर मंदिरातील उपासनाधाम केंद्राचे उद़्घाटन !
मिरज – मिरजेच्या काशीविश्वेश्वर मंदिरात विविध आध्यात्मिक संस्था, तसेच अन्य संस्था यांच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तरी भविष्यात असा कोणताही कार्यक्रम घेण्याच्या दृष्टीने तेथे उपासनाधाम उभारण्यात आले असून २९ मे या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक श्री. विलास चौथाई यांच्या हस्ते उद़्घाटन झाले. होम, यज्ञ, रुद्र, सामूहिक पठण, जप-जाप्य अशा अनेक स्वरूपाचे धार्मिक कार्यक्रम आणि विधींसाठी हे केंद्र सर्वांना निःशुल्क उपलब्ध असणार असून त्याचा लाभ सर्व भाविकांना होणार आहे.
१. ही केवळ इमारत नसून काशी विश्वेश्वराच्या निसर्गरम्य प्रांगणामध्ये उभारण्यात आलेले हे या भागातील एक जागृत धर्मकेंद्र आहे. त्यामुळे या केंद्राची संकल्पना असणारे आणि निर्माते श्री. किशोर पटवर्धन यांचा सत्कार श्री. विलास चौथाई यांनी या प्रसंगी केला.
२. सध्या या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था, तसेच अन्य संस्था यांचे विविध कार्यक्रम नियमितपणे घेतले जातात.
३. या प्रसंगी प.पू. दादा महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. प्रियदर्शन चितळे, जिल्हा कार्यवाह श्री. नितीन देशमाने, श्री. शैलेंद्र तेलंग, श्री. राजू शिंदे, भाजपचे श्री. मकरंद देशपांडे, सांस्कृतिक आघाडी विभाग प्रमुख श्री. ओंकार शुक्ल, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. माधवराव गाडगीळ, सनातन संस्थेच्या डॉ. मृणालिनी भोसले यांसह अन्य उपस्थित होते.