शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार, १ कोटी ७ लाख विद्यार्थ्यांना होणार वाटप !
मुंबई, ३१ मे (वार्ता.) – नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळेच्या पहिल्यास दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्या राज्यातील १ कोटी ७ लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे. आतापर्यंत ६९ टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
शिक्षणाच्या नवीन धोरणानुसार इयत्ता १ ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. या वर्षी ४ लाख २९ सहस्र पाठ्यपुस्तकांची छपाई करण्यात आली आहे. या वर्षी केरळ राज्याच्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तकांमध्ये नोंदी ठेवण्यासाठी वह्यांची पानेही असणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी पाठ्यपुस्तकांची छपाई नव्याने करावी लागणार आहे.