कर्नाटकमध्ये महिलांना शासकीय बसमधून करता येणार विनामूल्य प्रवास !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर आता सरकारने राज्यातील शासकीय बसमध्ये महिलांना विनामूल्य प्रवास करण्याची अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, यासाठी महिलांना कोणत्याही प्रकारची अट नाही. आम्ही आमच्या घोषणापत्रात या संदर्भात कोणतीही अट ठेवली नव्हती.
यापूर्वी देहलीमध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारने राज्यातील शासकीय बसमध्ये महिलांना विनामूल्य प्रवास करू देण्याची घोषणा केली आहे.