अनधिकृत कृत्ये होणारा मदरसा त्वरित बंद करावा, हे ग्रामस्थांना कळते, ते प्रशासनाला का कळत नाही ?
‘रुमडामळ (गोवा) येथील मदरशामध्ये अनधिकृत कृत्ये होत असल्याने हा मदरसा त्वरित बंद करावा’, अशी मागणी ग्रामस्थांनी रुमडामळ पंचायतीच्या २८ मे २०२३ या दिवशी झालेल्या ग्रामसभेत केली. या अनधिकृत मदरशामुळे त्रास होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी यापूर्वीही पंचायतीकडे केली होती; मात्र या विरोधात कोणतीच कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभेत पुन्हा ही मागणी केली. ग्रामसभेत एका पंचसदस्याने ‘हा मदरसा बंद न झाल्यास तेथे डुक्कर आणून टाकणार’, असे विधान केल्याने या वेळी नवीन वाद निर्माण झाला.’ (२९.५.२०२३)