छत्रपती संभाजीनगर येथे मशिदीसमोर डीजे वाजवल्याने धर्मांधांची मिरवणुकीवर दगडफेक !
हिंदु आणि मुसलमान गटांतील ८० ते १०० जणांवर गुन्हे नोंद !
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे हिंदु आणि मुसलमान यांच्यात वाद झाल्याची घटना २९ मे या दिवशी समोर आली आहे. शेलगाव येथे नवरदेवाच्या मिरवणुकीत मशिदीसमोर डीजे वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या वाद झाला. त्यानंतर धर्मांधांनी थेट चाकूने आक्रमण केले आणि मिरवणुकीवर दगडफेकही केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. हिंदु आणि मुसलमान या दोन्ही गटांतील ८० ते १०० हून अधिक लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (मुसलमानांनी आक्रमण करूनही हिंदूंवर गुन्हे का नोंद करतात ? – संपादक) सध्या या गावात शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेलगाव येथे फुलंब्री तालुक्यातील निधोना येथील मंडळी विवाह सोहळ्यासाठी आली होती. विवाहातील नवरदेवाची वरात शेलगाव येथील मशिदीसमोर आली. या वेळी काही मुसलमानांनी ‘मशिदीसमोर डीजे वाजवू नका, बंद करा. तशी प्रथा आमच्या गावात नाही’, असे वरातीत नाचणार्या तरुणांना दरडावून सांगितले. बोलताबोलता वाद वाढला. या वेळी थेट चाकूने आक्रमण करण्यात आले.
या आक्रमणात हिंदु आणि मुसलमान दोघेही गंभीर घायाळ झाले आहेत. (धर्मांधांचा उद्दामपणा बंद करण्यासाठी पोलीस काहीच करत नसल्याने अशा घटना सतत घडतात ! – संपादक) या प्रकरणी २९ मेच्या रात्री विलंबाने पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदण्यात आले आहेत. (भारतात सर्वत्र ५ वेळा भोंग्यांवरून होणार्या नमाजामुळे सर्वत्रच्या हिंदूंना त्रास होतो. असे असूनही हिंदु त्याविषयी काहीच करत नाहीत. प्रत्येक ठिकाणी ‘मशिदीवरून हिंदूंची मिरवणूक जाणे म्हणजे दंगल’ असे जणू समीकरणच झाले आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका :मशिदीसमोर डीजे न वाजवण्याचे कारण सांगत आक्रमण करणारे उद्दाम धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत. ‘अशी मागणी करायला हे काही पाकिस्तान आहे का ?’, असा प्रश्न धर्मांधांना विचारून खडसावणे आवश्यक आहे. |