कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरातील १० शाळा अनधिकृत म्हणून घोषित
कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिका १० प्राथमिक शाळा अनधिकृत असल्याचे उघडकीस आले आहे. शिक्षण विभागाने हे घोषित केले असून या शाळेत पाल्यांना प्रवेश न घेण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.
अनधिकृत शाळांच्या सूचीमध्ये डोंबिवलीतील खंबाळपाडा, ९० फुटी रस्त्यावरील ओमकार इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस्.ई.), ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस्.ई.), ध.ना. चौधरी विद्यासंकुल, विबग्यार राईझ स्कूल (सी.बी.एस्.ई.), वसंत व्हॅली रोड, ईकरा इंग्रजी स्कूल अॅन्ड मक्तब, सर्वोदय सृष्टी, लिटल वंडर प्रायमरी स्कूल, दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, डी.बी.एस्. हिंदी अँड इंग्लिश स्कूल या शाळांचा समावेश आहे.
संपादकीय भूमिकाअनधिकृत शाळांची निर्मिती होऊन त्या चालू झाल्या, तरी शिक्षण विभागाला लक्षात कसे येत नाही ? |