शाहिदा युनुस काझी या महिला मंडल अधिकार्याला २० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले !
सोलापूर – वारस नोंदीच्या हरकतीवर सुनावणी घेऊन तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी २५ सहस्र रुपयांची लाच मागून २० सहस्र रुपये स्वीकारणार्या मंडल अधिकारी शाहिदा युनुस काझी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तक्रारदाराने वारसा नोंदीसाठी उमरड गंडळ (तहसील कार्यालय, करमाळा) येथे हरकती अर्ज सादर केला होता. या अर्जावर सुनावणी करून तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी मंडल अधिकारी शाहिदा काझी यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचारामध्ये धर्मांध महिलाही पुढे असणे देशासाठी धोकादायक ! |