हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात होर्डिंग कोसळले !
पिंपरी – किवळे येथील लोखंडी होर्डिंग कोसळून ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच हिंजवडी आयटी पार्क परिसरात लक्ष्मी चौक येथे पुन्हा एक मोठे होर्डिंग कोसळले. यामध्ये २ तरुण घायाळ झाले असून त्यांना रुग्णालयात भरती केले आहे. होर्डिंग कोसळल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांची हानी झाली आहे; मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. ‘पावसाळा चालू होण्यापूर्वी प्रशासनाने अनधिकृत होर्डिंगच्या संदर्भात कडक कारवाई करावी’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
संपादकीय भूमिका
|