‘मोगलांनी भारतात येऊन मंदिरे उद्ध्वस्त केली, ही चुकीची माहिती !’ – अभिनेते नसीरुद्दीन शाह
मुंबई – मोगलांचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे आहे. मोगल भारताला स्वत:ची मातृभूमी बनवण्यासाठी आले होते. ते भारताला लुटायला आले नव्हते. मोगल भारतात लूट करण्यासाठी आले आणि त्यांनी मंदिरे उद्ध्वस्त केली, ही चुकीची माहिती आहे, अशी वल्गना अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी ‘बॉलिवूड हंगामा’ संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केली.
‘मुगल भारत को अपनी मातृभूमि बनाने आए थे, लूटपाट करने नहीं’ नसीरुद्दीन शाह ने इतिहास की किताबों में हुए बदलाव पर उठाए सवाल#NaseeruddinShah https://t.co/GvTBOtTHHH
— Jansatta (@Jansatta) May 31, 2023
शाह पुढे म्हणाले, ‘‘सर्व मुसलमानांना एका रंगात रंगवण्याचा सध्याच्या सरकारचा प्रयत्न आहे. ‘हुमायू याला अफूचे व्यसन होते. तो एके दिवशी पायरीवरून खाली पडला. अकबर याने अमुक केले’, असे म्हटले जाते. औरंगजेब या सर्वांमध्ये सर्वांत मोठा खलनायक होता; पण मोगलांविषयी बोलणारे पूर्वी येथे असलेल्या अन्य घराण्यांविषयी बोलत नाहीत. मोगल राजघराण्याआधीही येथे तुर्कांची अनेक घराणी होती. सर्व मोगलांचा दर्जा खाली आणणे, हे सध्याच्या सरकारसाठी सोयीचे आहे. ‘मोगलांनी देश लुटला, त्यांनी मंदिरे उद्ध्वस्त केली. त्यांना अनेक बायका होत्या’, असे अनेक दावे केले जातात. उत्क्रांतीचा सिद्धांत पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकला आहे. मला तर वाटते की, आइन्स्टाइनची विज्ञानाची पाठ्यपुस्तकेही काढून टाकली जातील आणि सर्व वैज्ञानिक शोध वेदांमध्ये आहेत, पाश्चिमात्य देश या सर्व शोधांचे श्रेय घेत आहेत, असे इस्रोचे प्रमुख म्हणतांना दिसतील.’’
EXCLUSIVE: नसीरुद्दीन शाह ने मुगलों का पक्ष लेते हुए कहा, “मुगल भारत का धन छीनने नहीं आए थे ; सभी मुसलमानों को एक रंग में रंग देना बहुत आसान है”
#NaseeruddinShah
LINK: https://t.co/OW7ecdjOk3 pic.twitter.com/WoWcoHcaqs— BollyHungama (@Bollyhungama) May 30, 2023
संपादकीय भूमिका
|