देहलीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील शाळा बंद !
कर्मचार्यांना ३ वर्षांपासून वेतन न दिल्याने शाळा बंद करण्याची नामुष्की !
नवी देहली – येथील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील शाळा बंद करण्यात आली आहे. शाळेच्या कर्मचार्यांना ३ वर्षांपासून वेतन न मिळाल्याने शाळा बंद करण्याची नामुष्की पाकवर ओढावली आहे.
तथापि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण देतांना ‘तेथे शिकणार्या विद्यार्थ्यांची संख्या अल्प झाल्याने शाळा बंद करण्यात आली’, असे म्हटले आहे. उच्चायुक्तालयातील कर्मचार्यांची मुले या शाळेत शिकत होती.
संपादकीय भूमिकाभारताशी युद्ध करून त्यावर नियंत्रण मिळवण्याचे स्वप्न पहाणार्या पाकची ही स्थिती लवकरच तो देशोधडीला लागणार आहे, याचेच दर्शक आहे ! |