ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून धर्मांतर : नमाजपठणासाठी मशिदीत जाऊ लागला जैन मुलगा !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे धर्मांतराचे एक प्रकरण समोर आले आहे. येथील जैन कुटुंबातील १७ वर्षांच्या मुलाचा ‘ऑनलाईन गेमिंग अॅप’द्वारे बुद्धीभेद करण्यात आला. त्यानंतर तो मुलगा ५ वेळा नमाजपठणासाठी मशिदीत जाऊ लागला. कुटुंबियांना याची माहिती मिळाल्यावर मुलाने झाकीर नाईकच्या प्रभावाखाली धर्मांतर केल्याची स्वीकृती दिली. पीडित मुलाच्या वडिलांनी गाझियाबादमधील कविनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
ऑनलाइन गेम्स से ब्रेनवॉश, नमाज पढ़ने मस्जिद जाने लगा 17 साल का जैन लड़का: पीड़ित पिता ने करवाई FIR, जाकिर नाईक से प्रभावित हो बना मुस्लिम#UttarPradesh https://t.co/RhYvJPhrhP
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 31, 2023
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाचे कुटुंब गाझियाबादमधील राजनगरमध्ये रहाते. पीडित मुलगा व्यायामशाळेत (जिममध्ये) जाण्याच्या बहाण्याने प्रतिदिन ५ वेळा घराबाहेर पडत होता. वडिलांना ते संशयास्पद वाटल्याने त्यांनी मुलाचा पाठलाग केला असता तो प्रत्येक वेळी मशिदीत जाऊन नमाजपठण करत असल्याचे आढळून आले. यावर त्यांनी आपल्या मुलाशी चर्चा केली असता त्याने इस्लाम धर्म स्वीकारल्याचे सांगितले.
वडिलांनी मुलाचा भ्रमणभाष आणि लॅपटॉप पडताळला असता त्यांना इस्लामशी संबंधित बरेच साहित्य आढळून आले. या वेळी त्यांना एका ‘ऑनलाईन गेमिंग अॅप’च्या माध्यमातून त्यांच्या मुलाची बद्दो नावाच्या व्यक्तीशी मैत्री झाल्याचे समजले. पीडित मुलाने बद्दोकडून संगणकाचे साहित्य विकत घेतले होते. तेव्हापासून त्यांची मैत्री वाढत गेली. पीडित मुलगा बद्दो याच्याशी भ्रमणभाषवर घंटोंघंटे बोलत होता. त्याच्या भ्रमणभाषवर अनेक संशयास्पद क्रमांकही सापडले आहेत. आपला मुलगा अल्पवयीन असून त्याचा बुद्धीभेद करण्यात आला आहे. त्यामुळे आता तो घर सोडून मशिदीच्या इमामासमवेत रहाण्याची भाषा करत आहे. एवढेच नाही तर आपला मुलगा देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
या संपूर्ण प्रकरणात कविनगरचे पोलीस अधीक्षक अभिषेक श्रीवास्तव यांनी सांगितले की, पीडित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे संजयनगरमधील मशिदीचा इमाम आणि मुंबईतील रहिवासी बद्दो या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचे अन्वेषण करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकावेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून धर्मांतर करणार्या जिहाद्यांचे षड्यंत्र जाणा ! असे प्रकार रोखण्यासाठी कठोर धर्मांतरबंदी कायदा हवा ! |