बरेली (उत्तरप्रदेश) येथे आनंद उपाख्य महंमद आलिम याचा हिंदु मुलीच्या विरोधात लव्ह जिहाद !
स्वतःचे हिंदु नाव सांगून पीडितेची फसवणूक
बरेली (उत्तरप्रदेश) – येथे संगणक शिकण्यासाठी येणार्या एका हिंदु मुलीला ‘आनंद’ नावाने वावरणार्या महंमद आलिम याने लव्ह जिहादचे षड्यंत्रामध्ये अडकवले. स्वत:चे नाव आनंद असल्याचे सांगून, तसेच हातावर देवाचा दोरा बांधून त्याने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला मंदिरात नेऊन तिच्या भांगात कुंकू भरल. त्यानंतर त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे चित्रीकरण करून पुढे तिला तो सतत धमकावू लागला. तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. पीडिता गर्भवती झाल्यानंतर ती त्याच्या घरी गेली असता तो आनंद नसून महंमद आलिम असल्याचे तिला समजले. त्यानंतर महंमदने तिला गर्भपात करायला लावून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला, तसेच घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. या सगळ्याला कंटाळून पीडितेने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आलिम याच्या विरोधात अन्वेषण चालू केले आहे.
Bareilly: Mohammad Alim posed as Kalava wearing Anand to lure a Hindu girl, raped her and tried to convert her, case registeredhttps://t.co/uk5wBCghot
— OpIndia.com (@OpIndia_com) May 31, 2023
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेश शासनाने लव्ह जिहादविरोधी कायदा करूनही तेथील धर्मांध मुसलमानांना त्याचे भय वाटत नाही, हेच वारंवार घडणार्या अशा घटनांतून समोर येते. यावर आता राज्य सरकारने फाशीसारख्या कठोर शिक्षांचा विचार करणे आवश्यक आहे ! |