पाटलीपुत्र (बिहार) येथील पारस रुग्णालयात अडीच वर्षांपासून कार्यरत फारूकी नावाचा बनावट डॉक्टर बडतर्फ !
केंद्रीय अन्वेषण विभागाने लक्षात आणून दिल्यावर केली कारवाई !
पाटलीपुत्र (बिहार) – येथील प्रसिद्ध पारस रुग्णालयामध्ये डॉक्टर म्हणून नोकरी करणारा महंमद शमीम फारूकी हा बनावट डॉक्टर असल्याचे समोर आल्यानंतर त्याला बडतर्फ करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून तो फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
फारूकी हा मूळचा बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यातील रहिवासी असून त्याने वैद्यकीय शिक्षणासाठी नेपाळच्या काठमांडू विद्यापिठामध्ये प्रवेश घेतला. तेथील परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतरही त्याने तेथील विद्यापिठातून बनावट पदवी बनवून घेतली. विदेशातून वैद्यकीय पदवीप्राप्त डॉक्टरांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘फॉरेन मेडिकल ग्रेजुएट’ परीक्षेसाठी तो बसला असता त्यातही तो अनुत्तीर्ण झाला. तरीही त्याने ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महंमद जावेद नावाच्या डॉक्टरची कागदपत्रे मिळवून बनावट प्रशस्तीपत्रक बनवून घेतले आणि त्यावर हरियाणातील एका रुग्णालयात काही काळ अन् डिसेंबर २०२० पासून पाटलीपुत्रमधील पारस रुग्णालयात नोकरी करू लागला.
सौजन्य झी बिहार झारखंड
केंद्रीय अन्वेषण विभागाने डिसेंबर २०२२ मध्ये देशभरातील ७४ बनावट डॉक्टरांची सूची घोषित केल्यानंतरही तब्बल ६ मास पारस रुग्णालयाला फारूकीचे नाव त्या सूचीत असल्याचे ठाऊक नव्हते. काही दिवसांपूर्वी जेव्हा केंद्रीय अन्वेषण विभागाने याविषयीची माहिती रुग्णालयाला दिली, तेव्हा रुग्णालयाने त्याच्या विरोधात बडतर्फीची कारवाई केली.
संपादकीय भूमिकाजर केंद्रीय अन्वेषण विभागाने याविषयी माहिती दिली नसती, तर हा बनावट डॉक्टर तसाच कार्यरत राहिला असता ! त्यामुळे त्याला नोकरीवर ठेवून रुग्णांचे जीव धोक्यात घालणार्या रुग्णालय व्यवस्थापनाची चौकशी करून दोषी अधिकार्यांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक ! |