गोधरा हत्याकांडावरील ‘गोधरा : अपघात कि षड्यंत्र’ या चित्रपटाचे संक्षिप्त विज्ञापन (टीझर) प्रदर्शित !
मुंबई – धर्मांध मुसलमानांकडून गुजरातमधील गोधरा रेल्वे स्थानकावर वर्ष २००२ मध्ये साबरमती एक्सप्रेसचा डबा जाळण्यात आला होता. यामुळे डब्यातील ५९ कारसेवकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती. या घटनेवर आता ‘गोधरा : अपघात कि षड्यंत्र’ या नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे संक्षिप्त विज्ञापन अर्थात् ‘टीझर’ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एम्.के. शिवाक्ष यांनी केले आहे.
सौजन्य: Artverse Studios
एक मिनिटाच्या या विज्ञापनात कोणत्याही अभिनेत्याचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही; मात्र त्या घटनेशी निगडित बर्याच महत्त्वाच्या गोष्टींची झलक दाखवण्यात आली आहे. ‘हा चित्रपट वर्ष २००२ च्या गोधरा दुर्घटनेच्या सत्य घटनांवर आधारित असल्याचा दावा या विज्ञापनात करण्यात आला आहे. यासह ‘साबरमती एक्स्प्रेस, डबा क्र. एस् ६, ५९’ ही अक्षरे अत्यंत ठळकपणे यात दाखवण्यात आली आहेत.