काश्मीरमध्ये ३ आतंकवाद्यांना अटक
१० किलो स्फोटके, शस्त्रे आणि अमली पदार्थ जप्त
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरमधील करमारहा सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रणे रेषेजवळ ३ आतंकवाद्यांना अटक केली.
J-K: Infiltration bid foiled on LoC in Poonch, 3 terrorists arrested
Read @ANI Story | https://t.co/UlTaZdqemO#JammuKashmir #IndianArmy #Poonch pic.twitter.com/x10RMcIdJh
— ANI Digital (@ani_digital) May 31, 2023
हे तिघेही ३० मेच्या रात्री वाईट हवामान आणि पाऊस यांचा अपलाभ घेत भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्या वेळी त्यांच्यावर सैनिकांनी गोळीबार केला. यात एक आतंकवादी घायाळ झाला. त्यानंतर तिघाही आतंकवाद्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून १० किलो स्फोटके, एके ४७ रायफल आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे अन् अमली पदार्थ जप्त करण्यात आले. हे तिघेही शस्त्रे आणि अमली पदार्थ यांची तस्करी करत होते.