राज्यातील ५५ सहस्र ७९७ कर्तबगार महिलांचा सन्मान करणार ! – मंगलप्रभात लोढा, मंत्री, महिला आणि बाल विकासमंत्री
मुंबई – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यशासन राज्यातील २७ सहस्र ८९७ ग्रामपंचायतींमधील ५५ सहस्र ७९७ कर्तबगार महिलांचा सन्मान करणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ३० मे या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे अंगणवाडी दत्तक योजनेचा सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी मंत्रीमहोदयांनी वरील माहिती दिली.
या वेळी राज्यातील ४२४ अंगणवाड्या दत्तक घेण्याविषयीचे सामंजस्य करार या वेळी करण्यात आले. राज्यात १ लाख १० सहस्र ४४६ अंगणवाड्या कार्यरत असून त्यांतील ४२४ अंगणवाड्या दत्तक घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत १५६ सामाजिक संस्थांनी ४ सहस्र ८६१ अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत.