अहिंसेद्वारेच भारत आणि पाक यांच्यातील संबंध सुधारतील ! – जैन मुनी
इस्लामाबाद (पाकिस्तान) – अहिंसेनेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारू शकतात. अहिंसाच जगातील संबंध बिघडलेल्या देशांना जवळ आणू शकते; परंतु राजकारण करणार्यांना असे होऊ द्यायचे नाही, असे मत पाकिस्तानच्या दौर्यावर असलेले आचार्य धर्मधुरंदर सुरी महाराज यांनी व्यक्त केले. ते लाहोर आणि गुंजरांवाला या दोन शहरांना भेटी देणार आहेत.
पाकिस्तानात एकही जैन नाही, परंतु स्वागतासाठी शेकडोंची अलोट गर्दी; अहिंसेद्वारेच भारत-पाक संबंध सुधारतील : जैन मुनी#JainMunihttps://t.co/60wTQukYRV
— Divya Marathi (@MarathiDivya) May 30, 2023
स्वातंत्र्यानंतर प्रथमच एक जैन मुनी पाकिस्तानच्या भेटीवर गेले आहेत. पाकिस्तानात आता एकही जैन उरलेला नाही. तरीही मुनींच्या स्वागतासाठी शेकडो लोक आले होते. या वेळी लाहोरमधील जैन मंदिराच्या पुनर्बांधणीविषयी धर्मधुरंधर सुरी महाराज यांनी अप्रसन्नता व्यक्त केली. नवीन मंदिर किमान जैन मंदिरासारखे दिसायला हवे, असे ते म्हणाले.
संपादकीय भूमिकाजिहादी पाकिस्तान हे कधीच मान्य करणार नाही, हेही तितकेच खरे ! |