मारेकरी साहिल खान याला हत्या केल्याचा जराही पश्चाताप नाही !
देहली येथील हिंदु मुलीच्या हत्येचे प्रकरण
नवी देहली – येथे १६ वर्षीय साक्षी हिची हत्या करणार्या महंमद साहिल खान याला न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या चौकशीत साहिल ‘मी ही हत्या केल्याविषयी मला जराही पश्चात्ताप होत नाही’, असे म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. साहिल याने हत्येच्या १५ दिवस आधी चाकू विकत घेतल्याचे पोलिसांना सांगितले. अचानक झालेल्या प्रेमभंगामुळे राग आल्याने त्याने साक्षीची हत्या केल्याचेही त्याने सांगितले.
“मला पश्चाताप नाही, तिनेच माझ्याकडे….”, तरुणीची 22 वेळा भोसकून हत्या करणाऱ्या आरोपीचा धक्कादायक कबुलीनामा https://t.co/CWpFg4WgaK #Delhi #DelhiCrime #Sahil #DelhiCrimeNews
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 30, 2023
१. साक्षीने तिच्या हातावर दुसर्या मुलाच्या नावाचा ‘टॅटू’ (गोंदवून घेण्याचा एक प्रकार) बनवला होता. ती आधी प्रवीण नावाच्या मुलावर प्रेम करत होती. वर्षभरापूर्वी दोघांमध्ये बिनसले. यानंतर ती साहिलशी प्रेम करू लागली होती. काही दिवसांपासून साक्षीने प्रवीणशी पुन्हा बोलणे चालू केले होते. याचा साहिलला राग आला होता. त्यानंतर साक्षी साहिलला प्रतिसाद देत नव्हती. साहिलने ४ दिवसांपूर्वी साक्षीला ‘कोणत्याही मुलाशी बोलू नको’, अशी धमकी दिली होती; मात्र साक्षीने ती धुडकावून लावली.
२. साहिलने त्याच्या ‘इंस्टाग्राम अकाऊंट’वर एका पोस्टमध्ये ‘जग आपल्याला शांतपणे जगू देत नाही. दहशत पसरवणे आवश्यक आहे’, असा चिथावणीखोर मजकूर प्रसारित केला होता.
संपादकीय भूमिकाअशा मारेकर्यांच्या विरोधात लवकरात लवकर खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी देहली पोलिसांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे ! |