अनंतनाग येथे सर्कसमधील हिंदु कर्मचार्याची हत्या !
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदूंच्या हत्या चालूच !
अनंतनाग (जम्मू-काश्मीर) – जिहादी आतंकवाद्यांनी येथील ‘अम्युझमेंट पार्क’मधील सर्कसमध्ये काम करणार्या दीपू नावाच्या एका हिंदु कर्मचार्यावर गोळीबार करत त्याची हत्या केली.
#Ghaziabad365 – (अनंतनाग में आतंकियों ने फिर किया कायराना हमला, गरीब मजदूर को मारी गोली, सर्कस में करता था काम) – https://t.co/ixbWxrwTbv
— गाज़ियाबाद365 (@Ghaziabad365) May 29, 2023
दीपू हा उधमपूरचा रहिवासी आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्वीट करून दिली. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करून या हत्येचा निषेध केला आहे.
संपादकीय भूमिकाजोपर्यंत काश्मीरमधील जिहादी मानसिकता नष्ट केली जात नाही, तोपर्यंत तेथील आतंकवाद मुळासह कधीही नष्ट होऊ शकत नाही ! |