प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकार्याचे रिक्त पद आणि अन्य समस्या सोडवण्यासाठी जनतेला आंदोलन करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
‘सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकार्याचे रिक्त पद आणि अन्य समस्या यांविषयी येथील ग्रामस्थांनी २२ मे २०२३ या दिवशी चालू केलेले दीर्घकालीन उपोषण २४ मे २०२३ या दिवशी प्रशासनाच्या आश्वासनानंतर तूर्तास स्थगित केले आहे.’ (२६.५.२०२३)