संरक्षण दलाच्या विमान खरेदीत भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणी रोल्स रॉइस आस्थापन आणि सकारी अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद
नवी देहली – भारतीय वायूदल आणि नौदल यांसाठी ‘हॉक ११५’ या अत्याधुनिक ‘जेट ट्रेनर’ विमानाच्या खरेदीत लाच घेतल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) ‘ब्रिटीश एरोस्पेस’ आणि ‘रोल्स-रॉइस पीएल्सी’ या आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी अन् शस्त्रास्त्र विक्रेते यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या आरोपींनी वर्ष २००३ ते २०१२ या कालावधीत अज्ञात सरकारी अधिकार्यांच्या संगनमताने अनुमाने ८ सहस्र कोटी रुपयांच्या २४ हॉक विमानांच्या खरेदीसाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
#BREAKING | CBI files FIR against Rolls Royce, arms dealers for alleged corruption in Hawk Advanced Jet Trainer aircraft deal#CBI #Coruption #RollsRoyce pic.twitter.com/uwD2W4h5Nq
— Republic (@republic) May 29, 2023
संपादकीय भूमिकाभारतात असे कुठले क्षेत्र नाही जेथे भ्रष्टाचार होत नाही ? |