शिवमोग्गा येथे अपघातात घायाळ झालेल्या मुसलमान मुलीला घरी सोडणार्या हिंदु विद्यार्थ्यावर धर्मांधांकडून आक्रमण !
कर्नाटकातील दुसरी घटना !
शिवमोग्गा (कर्नाटक) – जिल्ह्यातील भद्रावती येथे एका २२ वर्षीय हिंदु युवकाने त्याच्या वर्गात शिकणार्या एका मुसलमान मुलीच्या बहिणीला तिच्या घरी सोडल्याने ५ धर्मांध मुसलमानांनी युवकाला ७ मे या दिवशी मारहाण केली. मुलगी कलंदरनगर येथील रहिवासी असून पीडित हिंदु युवक विश्वेश्वरय्यानगर येथे रहातो.
A group of five Muslim men assaulted a 20-year-old Hindu man for dropping his Muslim classmate to her house at Bhadravathi in #Shivamogga district
(Reports Coovercolly Indresh) https://t.co/9jkXm87v8H
— Hindustan Times (@htTweets) May 30, 2023
मुसलमान मुलीच्या बहिणीचा रस्त्यात अपघात होऊन ती घायाळ झाली होती. त्या वेळी तिने घरी सोडण्यासाठी हिंदु मित्राकडे साहाय्य मागितले. तो तिला घरी सोडून परतत असतांना झंडाकट्टे क्षेत्रातील ५ मुसलमान युवकांनी त्याला घेरले आणि त्याचे नाव विचारले. तो हिंदु असल्याचे कळताच त्यांनी त्याला मारहाण केली. या वेळी घटनास्थळी आलेल्या अभि आणि यशवंत या दोघा हिंदूंवरही धर्मांधांनी आक्रमण केले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून चौघा मुसलमानांना अटक करण्यात आल्याचे समजते.
४ राज्यांत घडल्या आहेत ७ घटना !उत्तरप्रदेशातील बिजनौर, मुझफ्फरनगर आणि मेरठ, बिहारची राजधानी पाटलीपुत्र, गुजरातची राजधानी कर्णावती, तसेच कर्नाटकातील चिक्कबळ्ळापूर आणि आता शिवमोग्गा या शहरांमध्येही अशा घटना घडल्याचे गेल्या काही दिवसांत समोर आले आहे. (यावरून धर्मांध मुसलमानांचे हिंदूंविरुद्ध हे षड्यंत्र आहे का ? याची चौकशी झाली पाहिजे ! – संपादक) |
संपादकीय भूमिका
हिंदु मुलींशी लव्ह जिहाद करणार्या धर्मांधांना हिंदु तरुणांनी मुसलमान मुलींना साहाय्य केलेलेही चालत नाही, हे लक्षात घ्या !