पाकिस्तानला भाडेतत्वावर दिलेले विमान मलेशियाकडून जप्त !
विमानाचे भाडे न भरल्याने मलेशियाकडून कारवाई !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असणर्या पाकला त्याचा मुसलमान मित्र देश मलेशियाने झटका दिला आहे. मलेशियाने पाकच्या सरकारी विमान वाहतूक आस्थापनाचे ‘बोईंग ७७७ ’हे विमान जप्त केले. पाकिस्तानने मलेशियाचे कर्जाचे पैसे करत न केल्याने मलेशियाने ही कारवाई केली आहे.
#BreakingNews | Pakistan International Airways plane confiscated by the Malaysian authorities because of unpaid bills
Exclusive inputs by @manojkumargupta @siddhantvm shares more details with @poonam_burde #NationaAt5 #Pakistan #Malaysia #PakistanAirlines #PIA pic.twitter.com/OGrGnfxoWI
— News18 (@CNNnews18) May 30, 2023
पाकिस्तानी एयरलाईनने हे विमान मलेशियाकडून भाडेतत्वावर घेतले होते. पाकने विमानाचे भाडे न भरल्याने ते मलेशियाची राजधानी कुआलालंपूर येथील विमानतळावर जप्त करण्यात आले. पाकिस्तानने मलेशियाला भाड्यापोटी ३३ कोटी ८ लाख रुपये देणे आवश्यक होते. वर्ष २०२१ मध्येही पाकिस्तानी विमान कुआलालंपूर विमानतळावर जप्त करण्यात आले होते. त्यानंतर पाकने पैसे भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर मलेशियाने विमान परत केले होते; मात्र त्यानंतरही पाकने पैसे न दिल्याने मलेशियाने आता विमान पुन्हा जप्त केले आहे.