हिंदूंना मजारीची पूजा न करण्याचे आवाहन करणारा फलक पोलिसांनी हटवला !
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील प्रकार
(मजार म्हणजे मुसलमानाचे थडगे)
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील टाऊन हॉल जवळील एका मजारीसमोर राजेश गोयल या व्यक्तीने एक फलक लावला होता. त्याद्वारे ‘हिंदूंनी मजारीची पूजा करू नये’, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानंतर पोलिसांनी हा फलक येथून हटवला.
यूपी के मुजफ्फरनगर में मजार के सामने लगा दिया भड़काऊ पोस्टर…#posterwar #UttarPradesh #viralposterhttps://t.co/Dtm5WOngez
— Zee News (@ZeeNews) May 30, 2023
१. या फलकावर लिहिण्यात आले होते की, हिंदु बांधवांना विनंती आहे की, कृपया त्यांनी मजारीची पूजा करणे पूर्णपणे बंद करावे. आपल्या सनातन धर्मामध्ये कुठेही मजारीची पूजा करण्यास सांगितलेले नाही. त्यामुळे मी सनातनी लोकांना विनंती करतो की, त्यांनी मजारीची पूजा करणे बंद करावे.’ या फलकाच्या शेवटी ‘जय हिंदु राष्ट्र’ असे लिहिण्यात आले होते.
२. राजेश गोयल यांनी माध्यमांना सांगितले की, उत्तरखंडमधील भाजप सरकार अवैध मजारींवर कारवाई करत आहे. आमची उत्तरप्रदेश सरकारकडे मागणी आहे की, राज्यात जितक्या अवैध मजारी आहे, त्या सर्वांवर बुलडोझर चालवावा. (मुळात असे सरकारला सांगावे लागू नये. सरकारने स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारची कृती करतात ! हिंदूंच्या सर्व संघटनांनी आता युद्धपातळीवर सर्वत्र धर्मशिक्षण वर्ग चालू करून हिंदूंना जागृत करणे आणि त्यांना साधनेचे योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे ! |