(म्हणे) ‘सत्ताधारी पक्ष समाजातील मुसलमान द्वेषाचा वापर अतिशय हुशारीने करत आहे !’ – अभिनेते नसीरूद्दीन शाह
मुंबई – सध्याचा काळ खरोखर चिंताजनक आहे. सध्या ‘मुसलमानांचा द्वेष’ ही अगदी सुशिक्षित लोकांमध्येही ‘फॅशन’ झाली आहे. (खोटे बोल पण रेटून बोल’, या वृत्तीचे शाह ! या देशात हिंदुद्वेष ही खर्या अर्थाने ‘फॅशन’ बनली आहे, हे कुणीही सांगेल ! – संपादक) सत्ताधारी पक्ष याचा अतिशय हुशारीने वापर करत आहे, अशी गरळओक अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी केली. ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
सध्याच्या सत्ताधारी पक्षाने अत्यंत हुशारीने ही गोष्ट लोकांच्या डोक्यात, मनात रुजवली…https://t.co/iop6KH4kLv < येथे वाचा सविस्तर वृत्त#entertainment #EntertainmentNews #actor #muslim #bollywoodactress #NaseeruddinShah pic.twitter.com/Z6P824G5hQ
— LoksattaLive (@LoksattaLive) May 30, 2023
यामध्ये नसीरूद्दीन शाह यांनी म्हटले आहे की, आम्ही (मुसलमान) धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांविषयी बोलतो, मग तुम्ही प्रत्येक गोष्टीत धर्म का आणता ? ‘इस्लाद्वेषाचा’चा उपयोग केवळ निवडणुकीत मते मिळवण्यासाठी केला जात आहे. समाजात चुकीची माहिती पसरवण्यासाठी काही चित्रपट आणि कार्यक्रम यांचा साधन म्हणून वापरला केला जात आहे. मते मिळवण्यासाठी धर्माचा वापर करणार्या राजकारण्यांसाठी निवडणूक आयोग मूकप्रेक्षक बनला आहे. (निवडणूक आयोगावर अशी टीका करणे कायद्यात बसते का ? अशांवर निवडणूक आयोग कारवाई करणार का ? – संपादक)
“एखाद्या मुस्लीम नेत्याने…”, कर्नाटकमधील पराभवावरून नसीरुद्दीन शाहांची पंतप्रधान मोदींवर टीका; निवडणूक आयोगालाही सुनावले खडे बोलhttps://t.co/oGgWM6y9cg via @loksattalive #PMModi #NaseeruddinShah #Muslim #Election
— LoksattaLive (@LoksattaLive) May 30, 2023
एखाद्या मुसलमान नेत्याने ‘अल्ला हू अकबर’ म्हणत मते मागितली असती, तर किती मोठा गोंधळ झाला असता ? लोकांमध्ये फूट पाडणारे हे धर्माचे सूत्र एके दिवशी निघून जाईल, अशी आशा आहे. पंतप्रधान लोकांपुढे जाऊन अशा गोष्टी बोलतात आणि तरीही ते हरतात. त्यामुळे मला आशा आहे की, राजकारणात धर्माचा प्रभाव बंद होईल; पण सध्या तरी मुसलमानद्वेष चालू आहे. या शासनाने हुशारीने ही खेळी खेळली आहे. (इतकी वर्षे काँग्रेसने मुसलमानांचे लांगूलचालन करून मते मिळवली. धर्माच्या आधारावर लाभ मिळवला जात असतांना नसीरूद्दीन शाह यांना धर्माची आठवण कधी का झाली नाही ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|