हरियाणात ‘पोलीस’ असे लिहिलेल्या चारचाकी वाहनातून गोतस्करी !
गुरुग्राम (हरियाणा) – येथे ‘पोलीस’ असे लिहिलेल्या ‘स्कॉर्पिओ’ या चारचाकी वाहनातून गोतस्करी करण्यात आल्याचे उघड झाले. या वाहनात ३ गायी कोंबल्या होत्या. त्यांची तोंडे बांधून ठेवली होती.
या वाहनातून गोतस्करी होत असल्याची माहिती मिळताच गोरक्षक मोनू मानेसर यांच्या सहकार्यांनी त्या वाहनाचा पाठलाग केला. वाहनात काय आहे ?, हे दिसू नये यासाठी वाहनाला काळ्या काचा बसवण्यात आल्या होत्या. गोरक्षकांनी वाहनाचा व्हिडिओ बनवला. गोरक्षकांना पहाताच गोतस्करांनी गोरक्षकांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात गोरक्षकांनी वाहनाच्या टायरवर गोळीबार केला. त्यामुळे वाहनाचा टायर फाटला. कुंडली-मानेसर-पलवल या महामार्गावर हा प्रकार घडला. भल्या पहाटेची वेळ असल्याने सर्व गोतस्कर आंधाराचा लाभ घेत पळून गेले. वाहनातील गायींची सुटका करून त्यांना गोशाळेत पाठवण्यात आले आहे.
#Video | गुरुग्राम में गौ तस्करों का आतंक, रोके जाने की कोशिश करने पर चलाई गोली, फरार pic.twitter.com/qvLxby0rYG
— NDTV India (@ndtvindia) May 29, 2023
संपादकीय भूमिकायावरून गुंड, गोतस्कर आदी पोलिसांना जराही घाबरत नसल्याचे स्पष्ट होते ! हे पोलिसांना लज्जास्पद ! |