अवघ्या २४ घंट्यांत इराणवर विजय मिळवू ! – तालिबानची धमकी
काबूल (अफगाणिस्तान) – तालिबानी सैन्य आणि इराणचे सैन्य यांच्यात २८ मे या दिवशी पाण्यावरून सीमेवर गोळीबार करण्यात आला. त्यात एका तालिबान्यासह इराणचे ३ सैनिक ठार झाले. दोन्ही देशांत हेलमंड नदीच्या पाण्यावरून वाद चालू आहे. तालिबानने ‘हे युद्ध इराणने चालू केले असून तालिबान नेत्यांनी अनुमती दिली, तर आम्ही अवघ्या २४ घंट्यांत इराणवर विजय मिळवू’, अशी धमकी तालिबानचा कमांडर हमीद खोरासानी याने दिली.
सौजन्य टीव्ही 9 भारतवर्ष