यवतमाळ येथील भागवताचार्य संतोष महाराज जाधव यांच्यावर गोतस्करांचे आक्रमण !
डोक्याला गंभीर दुखापत, तर डावा हात निकामी
यवतमाळ, २८ मे (वार्ता.) – लाडखेड पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्या सोनखास लासिणा रस्त्यावर २७ मे च्या रात्री ८ वाजता एका ट्रकमध्ये गायी असल्याचा संशय भागवताचार्य श्री. संतोष जाधव महाराज यांना आला. त्यांनी याविषयी विचारल्यावर गोमातेची तस्करी करणार्या ५ – ६ जणांनी महाराजांवर आक्रमण केले. या वेळी तेथून जाणारे बंजारा युवक महाराजांच्या साहाय्याला धावून आले; पण तोपर्यंत मारेकरी ट्रक घेऊन पळाले.
महाराजांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. या आक्रमणात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा डावा हात निकामी झाला आहे. यापूर्वीही धामणगाव मार्गावर गोमातेची तस्करी करणारा ट्रक अडवल्याने त्यांच्यावर आक्रमण झाले होते. मध्यप्रदेशातून आंध्रप्रदेश या राज्यामध्ये जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गोतस्करी होत आहे. (यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार ? – संपादक)
४ – ५ वर्षांपूर्वी महाराजांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून भाग्यनगर येथून जिल्ह्यातील १३ हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यातून सोडवून परत आणले होते.
संपादकीय भूमिकामहाराष्ट्रात गोहत्याबंदी कायदा आहे. असे असतांनाही राज्यात गोतस्करी होते आणि त्याला विरोध करणार्या गोप्रेमींना जीव मुठीत धरून जगावे लागते. महाराष्ट्रात अशा घटना घडणे संतापजनक होय ! |